पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वायुदलाच्या माजी कर्मचाऱ्याने मोदींना ५ पानी पत्र लिहून केली आत्महत्या

वायुदलाच्या माजी कर्मचाऱ्याची आत्महत्या

आर्थिक अडचणी आणि कुटुंबियांसाठी काहीच करु न शकल्यामुळे निराश झालेल्या वायुदलाच्या माजी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. इलाहाबाद येथील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ पानांचे पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाला आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली आहे. 

विक्रम लँडर सापडला पण झुकलेल्या अवस्थेत...

बिजल दास (५५ वर्ष) असं या आत्महत्या करणाऱ्या वायुदलाच्या माजी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते आसामचे राहणारे होते. हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री ११ वाजता ते या हॉटेलमध्ये आले होते. रविवारी सकाळी हॉटेलच्या रुमची सफाई करण्यासाठी कर्मचारी गेला मात्र दरवाजा बंद होता. त्यानंतर दुपारपर्यंत दरवाज बंद राहिल्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. खुल्ताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुमचा दरवाजा तोडून पाहिले असता बिजल दास यांनी पंख्याला गळफास लावून घेतला होता. 

..म्हणून काँग्रेससोबत आता आघाडी नाहीः प्रकाश आंबेडकर

पोलिसांना घटनास्थळी दारुची बॉटल, गुवाहटी ते इलाहाबादचे रेल्वे तिकीट आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र सापडले. या पत्रामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबियांसाठी काहीच करु शकलो नाही. माझा मुलगा विवेक दास खूप चांगला गाणी गातो. तो सारेगमप लिटिल चॅम्प २०१० या कार्यक्रमात सहभागी झाला होता. मात्र त्यानंतर आर्थिक अडचणींमुळे मी त्याला संगीताचे शिक्षण देऊ शकलो नाही. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा असे या पत्रामध्ये लिहिले आहे. 

कांगारुंनी अ‍ॅशेस मारली तरीही विराट बिग्रे़डच ठरेल भारी

तसंच, माझ्या पार्थिवावर अंतिम संस्कार इलाहाबादमध्येच करण्यात यावे. माझ्या कुटुंबियांना माझ्या मृत्यबाबत सांगू नका. तसंच अंत्यसंस्कारासाठी दीड हजार रुपये ठेवले आहे, असे देखील या पत्रात त्यांनी म्हटले आहे. देशामध्ये आर्थिक मंदी असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. देशामध्ये आर्थिक मंदी येण्याचे कारण भ्रष्टाचार आहे. २ जी आणि कोळसा घोटाळ्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. पी. चिदंबरम यांच्या घोटाळ्यामुळे देशात आर्थिक मंदी आली असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे. 

भास्कर जाधवही शिवसेनेत, शुक्रवारी औपचारिक प्रवेश