पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रघुराम राजन यांची IMFच्या प्रमुखपदी नियुक्तीची शक्यता

रघुराम राजन

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक होण्याची शक्यता आहे. आयएमएफचे प्रमुख क्रिस्टिन लेगार्ड यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा १२ सप्टेंबरपासून अंमलात येईल. क्रिस्टिन लेगार्ड युरोपीय सेंट्रल बँकेचे अध्यक्ष होणार आहेत.

मी राजकारणात आलो, तर बायको सोडून जाईल - रघुराम राजन

रघुराम राजन यांचे नाव आयएमएफच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त ब्रिटिश माध्यमांनी दिले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाला या पदासाठी एखाद्या भारतीयाच्या नावाला पाठिंबा देण्याची मागणी केली जात आहे. तेव्हापासून राजन यांच्या नावाला बळकटी आली आहे.

आयएमएफच्या प्रमुखपदी राजन यांच्याशिवाय बँक ऑफ इंग्लंडची माजी गव्हर्नर मार्क कार्नी, डेव्हिड कॅमेरुन सरकारमध्ये चान्सलर म्हणूम काम पाहिलेले जॉर्ज ओसबर्न आणि नेदरलँडचे माजी अर्थमंत्री जेरोईन डिजस्सेल ब्लोअम यांच्या नावाचीही चर्चा आहे. आयएमएफच्या प्रमुखपदी युरोप आणि अमेरिकेबाहेरील व्यक्ती नेमण्याची मागणी होत असल्यामुळे राजन यांची शक्यता वाढली आहे.

'भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होणार'