पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंगसह ४ जणांना अटक

शिविंदर सिंग

फार्मा कंपनी रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शिविंदर सिंग यांच्यावर फसवणूकीचा आरोप आहे. रेलिगेअर इंटरप्राइजेस लिमिटेडच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. शिविंदर सिंग यांच्यावर ७४० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार: नारायण राणे

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिविंदर सिंग यांच्यासह पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित इतर तीन जणांनाही अटक केली आहे. दरम्यान शिविंदर सिंगचा मोठा भाऊ मालविंदर सिंग याचा देखील शोध पोलिस घेत आहेत. मालविंदर सिंग यांचे देखील या प्रकरणात नाव आहे. 

मोदी, फडणवीस सरकार शेतकरीविरोधी : अजित पवार

ईडीने ऑगस्टमध्ये मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात रॅनबॅक्सी ग्रुपचे माजी प्रवर्तक मालविंदर  सिंग आणि शिविंदर सिंग यांच्या घरावर छापे टाकले होते. मनी लाँड्रिंग कायद्या अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत छापा टाकण्यात आला होता. 

रस्त्यावर प्रचार सभा घेऊ द्या; मनसेची निवडणूक आयुक्तांकडे मागणी