पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा हटवणार

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा हटवली जाणार असून त्यांना केवळ झेड प्लस सुरक्षाच मिळेल. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाच एसपीजी सुरक्षा आहे. विद्यमान सुरक्षेची समीक्षा करुन हा निर्णय घेतल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आह. मनमोहन सिंग यांना केवळ झेड प्लस सुरक्षाच पुरवली जाईल.

यापूर्वी केंद्र सरकारने काही खासदारांची सुरक्षा घटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १३०० हून अधिक कमांडो या कामातून मुक्त झाले होते. दरम्यान, गृह मंत्रालयाने ३५० व्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा करण्यात आली होती. त्यानंतर सीआरपीएफ, सीआयएसएफ, एनएसजी आणि दिल्लीचे पोलिस कमांडो्जचे हे काम काढून घेण्यात आले होत.

बेअर ग्रिल्सशी हिंदीत संवाद कसा साधला?, मोदींनीच दिलं उत्तर

गृह मंत्रालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेची समीक्षा करुन त्यांची सुरक्षा कमी केली होती. यात लालूंसह बसपाचे खासदार सतीशचंद्र मिश्रा, उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते संगीत सोम, भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांचा समावेश होता. उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा आणि एलजेपी खासदार चिराग पासवान आणि माजी खासदार पप्पू यादव यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली होती.

५ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्था शक्यः प्रणव मुखर्जी