पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठरलं... मनमोहन सिंग पंजाब सरकारच्या शिष्टमंडळासोबत कर्तारपूरला जाणार

डॉ. मनमोहन सिंग

कर्तारपूर साहिब येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत जाण्यास माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी होकार दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमासाठी पाकिस्तान सरकारने मनमोहन सिंग यांना निमंत्रण पाठविले होते. पण पाकिस्तान सरकारचे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी फेटाळले होते. आता ते पंजाब सरकारच्या निमंत्रणावरून या शिष्टमंडळासोबत या कार्यक्रमासाठी जाणार आहेत.

माथेफिरू तरूणाकडून प्रेयसीची हत्या, नंतर स्वतः केली आत्महत्या

गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये कर्तारपूर कॉरिडॉर सुरू होणार आहे. पाकिस्तानातील कर्तारपूरमधील दरबार साहिब ते पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक या श्रद्धास्थानांना या कॉरिडॉरच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. दरबार साहिबला जाणारे भाविक व्हिसाशिवाय केवळ परवान्याच्या माध्यमातून कर्तारपूरमध्ये जाऊ शकणार आहेत. 

मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यावेळी ते कधीही पाकिस्तानला गेले नव्हते. २००५-०६ मध्ये दोन्ही देशांनी काश्मिरच्या मुद्दयावर तोडगा काढण्यासाठी आराखडा निश्चित करण्याचे ठरविले होते. त्यावेळी ते पाकिस्तानला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण ते त्यावेळीही गेले नव्हते. 

आदित्य ठाकरे 'कोट्यधीश', जाणून घ्या संपत्ती

भारताच्या हद्दीत होणाऱ्या याच स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिले आहे. यासाठीच त्यांनी गुरुवारी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. कर्तारपूरला जाणाऱ्या शिष्टमंडळाला सर्व आवश्यक परवानग्या मिळाव्यात आणि त्यासाठी राजकीय शिष्टाई केली जावी, अशीही विनंती यावेळी अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ex PM Manmohan Singh accepts Amarinder Singhs invite to travel to Kartarpur Sahib next month says Punjab govt