पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशद्रोहाच्या खटल्यात पाकिस्तानात परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा

परवेझ मुशर्रफ

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या प्रकरणामध्ये तेथील विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये माजी लष्करप्रमुखांना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना आहे. २०१३ मध्ये मुशर्रफ यांच्याविरोधात पाकिस्तानातील विशेष न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पाकिस्तानच्या घटनेतील कलमांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. नोव्हेंबर २००७ मध्ये देशात आणीबाणी लागू करताना आणि तेथील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना अटक करताना त्यांनी घटनेतील तरतुदींची पायमल्ली केल्याचे म्हणणे होते.

विधानसभेत शिवसेना-भाजप आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की

राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यावर २००८ मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तान सोडले होते. त्यानंतर मार्च २०१६ मध्ये दुसऱ्यांदा वैद्यकीय उपचारांच्या कारणासाठी त्यांनी पाकिस्तानातून काढता पाय घेतला. त्यानंतर ते या प्रकरणात फरार घोषित करण्यात आले होते.

'घटनाबाह्य कायदा सरकारने मागे घ्यावा, नाही तर...'

मुशर्रफ यांच्याविरोधात मार्च २०१४ मध्येच सरकारी पक्षाने सर्व पुरावे विशेष न्यायालयापुढे ठेवले होते. पण या प्रकरणी सुनावणी प्रलंबित होती. पेशावरच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद शेठ यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मंगळवारी या संदर्भात निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आणि मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला.