पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानताना लिहिले...

सुषमा स्वराज

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज नाहीत. काल संध्याकाळपर्यंत सुषमा स्वराज मंत्रिमंडळात असणार की नाही यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण सुषमा स्वराज राष्ट्रपती भवनात आल्यावर निमंत्रितांच्या रांगेत बसल्यावर त्या नव्या मंत्रिमंडळात नसणार हे स्पष्ट झाले. शपथविधीचा कार्यक्रम झाल्यावर सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. 

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील १० प्रमुख चेहरे

आपल्या ट्विटमध्ये सुषमा स्वराज यांनी लिहिले आहे की, प्रधानमंत्री जी, गेल्या पाच वर्षात पररराष्ट्र मंत्री म्हणून तुम्ही मला देशवासियांची आणि अनिवासी भारतीयांची सेवा करण्याची संधी दिली. त्याचबरोबर मला मोठा सन्मान दिला. मी तुमची खूप आभारी आहे. आपले सरकार यशस्वीपणे चालू दे, हीच माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. 

त्यांनी हे ट्विट केल्यानंतर तासाभरातच ६००० पेक्षा जास्त जणांनी ते रिट्विट केले. हे ट्विट करण्यापूर्वीच सुषमा स्वराज यांनी ट्विटरमधील त्यांची वैयक्तिक माहितीही अद्ययावत केली. सुषमा स्वराज मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात नसणार हा अनेकांसाठी धक्काच होता. अनेकांना याबद्दल जराही कुणकुण लागली नव्हती. माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आता त्यांच्याकडेच परराष्ट्र मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

...म्हणून शरद पवार मोदींच्या शपथविधीला अनुपस्थित राहिले

सुषमा स्वराज यांनी प्रकृतीच्या कारणामुळे लोकसभा निवडणुकीतूनही माघार घेतली होती. लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी पक्षाला कळवले होते. युपीएच्या कार्यकाळत दहा वर्षे त्या लोकसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. लोकसभेतील त्यांची अनेक भाषणे गाजलेली आहेत.