पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

समन्स बजावूनही राजीव कुमार सीबीआय पुढे हजर झालेच नाहीत

राजीव कुमार

पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी राजीव कुमार सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या CBI कोलकातातील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत. या प्रकरणी हजर होण्याचा समन्स सीबीआयकडून राजीव कुमार यांना बजावण्यात आले होते. पण आपल्याला एक आठवड्यांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी राजीव कुमार यांनी केली आहे. दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सीबीआयच्या कार्यालयात पाठवून त्यांच्याकडून ही मागणी सीबीआयकडे करण्यात आली.

शारदा घोटाळा: IPS राजीव कुमार यांच्याविरोधात लुकआउट नोटीस

सीबीआयकडून विमानतळांवरही निर्देश पाठविण्यात आले असून, राजीव कुमार यांना देशाच्या बाहेर सोडू नये, असे सांगण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी सीबीआयकडून राजीव कुमार यांना समन्स जारी करण्यात आले आणि त्यांना सोमवारी सकाळी दहा वाजता चौकशीसाठी सीबीआयच्या कार्यालयात येण्यास सांगण्यात आले. 

२०१४ मध्ये राजीव कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने सुरुवातीला शारदा चिटफंड घोटाळ्याचा तपास केला होता. यावेळी राजीव कुमार यांनी पुरावे नष्ट केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. आपल्याकडे याचे पुरावे देखील आहेत, असाही दावा सीबीआयने केला आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला वाचविण्यासाठी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला पाठिशी घालण्यासाठी राजीव कुमार यांनी प्रयत्न केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

शारदा चिटफंड घोटाळा : राजीव कुमार यांना झटका

राजीव कुमार यांना अटक न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश काही दिवसांपूर्वीच मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्यांना अटक करण्यासाठी सीबीआयकडून सर्व तयारी केली जात आहे.