पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फारुख अब्दुल्ला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्ध

फारुख अब्दुल्ला

गेल्या ५ ऑगस्टपासून श्रीनगरमध्ये नजरकैदेत असलेले लोकसभेचे खासदार आणि जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (पब्लिक सेफ्टी ऍक्ट) कारवाई करण्यात आली आहे. या अंतर्गत त्यांना दोन वर्षांपर्यंत ताब्यात ठेवले जाऊ शकते.

एक्स्प्रेस वेवर अपघातात पुण्यातील डॉक्टरांसह दोघांचा मृत्यू

एमडीएमकेचे प्रमुख वैको यांनी फारुख अब्दुल्ला कुठे आहेत, हे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी या सगळ्याचा उलगडा झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचे निवासस्थान हे तात्पुरते कारागृह म्हणून घोषित करण्यात आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी जाणारे रस्तेही बंद करण्यात आले असून, कोणालाही त्या रस्त्यावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रत्येकी १२५ चा फॉर्म्युला निश्चित

जम्मू-काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कन्सल यांनी या सर्व हालचालींवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचबरोबर श्रीनगरचे पोलिस उपायुक्त शाहिद इकबाल चौधरी यांनीही हिंदुस्थान टाइम्सच्या प्रतिनिधीने केलेले फोन उचलले नाहीत.