पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आप'च्या अलका लांबा पुन्हा काँग्रेसमध्ये

अलका लांबा

आम आदमी पार्टीच्या माजी आमदार अलका लांबा काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांनी दिल्लीचे काँग्रेसचे प्रभारी पीसी चाको यांच्या उपस्थितीत सदस्यत्व स्वीकारले. त्या या आधी शुक्रवारी सदस्यत्व स्वीकारणार होत्या. पण काही कारणीमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. लांबा यांनी एक महिन्यापूर्वीच आपचा राजीनामा दिला आहे.

जम्मू-काश्मीरः श्रीनगरमधील लाल चौकाजवळ ग्रेनेड हल्ला

शुक्रवारी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा कार्यक्रम स्थगित झाल्याची माहिती लांबा यांनी टि्वटरवरुन देताना म्हटले होते की, आज काही अपरिहार्य कारणांमुळे काँग्रेसमध्ये मला आणि माझ्या सहकाऱ्यांना सहभागी होता आले नाही. आता आम्ही उद्या (शनिवारी) काँग्रेसमध्ये सहभागी होऊ. तुम्हा सर्वांना होत असलेल्या या असुविधेमुळे मी खेद व्यक्त करते, जय हिंद.

मोदी-जिनपिंग बैठकः भारताचे कूटनीतिक यश, काश्मीरवर चकार शब्द नाही

सहा सप्टेंबरला आप सोडल्यानंतर काही तासांतच लांबा यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवास्थानी काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचे टि्वट केले होते. २०१५ मध्ये आपमध्ये पक्ष प्रवेश करुन त्यांनी चांदनी चौक विधानसभा निवडणूक लढवली होती. यासाठी लांबा यांनी काँग्रेसशी असलेले सुमारे २० वर्षे जुने नाते तोडले होते. लांबा यांना दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी पक्षबदल कायद्याच्या आधारे अयोग्य घोषित केले होते. 

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या पीएची आत्महत्या