पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता घटनेच्या रक्षणासाठी लढतोय हे लक्षात ठेवा - राहुल गांधी

राहुल गांधी

काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राज्यघटनेच्या आणि देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी लढतोय, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे उदगार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढले. देशातील नागरिक कोणत्या वर्णाचे आहेत किंवा त्यांची श्रद्धा कोणावर आहे, याचा विचार न करता त्याच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपण लढले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटरच्या माध्यातून राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दयांबद्दल माहिती दिली. यावेळी राहुल गांधी यांनी देशातील मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले.

काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक शनिवारी संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेसच्या सदस्यांना संबोधित केले. सोनिया गांधी यांची यावेळी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. 

जयकुमार गोरे यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसचे ५२ खासदार निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्याच शनिवारी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेस कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा एकमताने फेटाळला असला, तरी अद्याप ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. काँग्रेसच्या ससंदीय पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. आता लोकसभेमध्ये काँग्रेसचे गटनेतेपद कोणाला मिळणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:every Congress member is fighting for the Constitution and for every person in India says rahul gandhi