पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात दहशतवादी चंद्रावरुन येत नाहीत, युरोपीय महासंघानं पाकला सुनावलं

पाक पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरप्रकरणी दुष्प्रचार करत आंतरराष्ट्रीय मुद्दा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला युरोपीय महासंघाने मोठा झटका दिला आहे. युरोप महासंघाच्या अनेक सदस्यांनी एकसुरात पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली. आपल्याला भारताला पाठिंबा दिला पाहिजे कारण पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण मिळते आणि ते शेजारी देशात हल्ले करतात, असे या सदस्यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर पाकने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित करण्याचा प्रयत्न सुरु केला असला तरी ते सातत्याने तोंडोवर पडताना दिसत आहेत. 

अरुणाचल प्रदेशः चीन सीमेवर भारताने वाढवली ताकद

युरोपीय महासंघाने ११ वर्षांत पहिल्यांदाच काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली आणि जाहीररित्या भारताचे समर्थन केले. या दरम्यान दहशतवादावरुन पाकिस्तानवर टीकाही केली. संसदेत चर्चेदरम्यान पोलंडचे नेते आणि महासंघाचे सदस्य रिजार्ड जार्नेकी म्हणाले की, भारत जगातील सर्वांत महान लोकशाहीचा देश आहे. आपल्याला भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे दहशतवादी चंद्रावरुन येत नाहीत. ते शेजारील देशातूनच (पाकिस्तान) येत आहेत. अशावेळी आपल्याला भारताचे समर्थन केले पाहिजे. 

पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत असल्याचे, इटलीचे नेते आणि युरोपीय महासंघाचे सदस्य फुलवियो मार्तुसिलो यांनी सांगितले. स्थानिक हल्ल्यांचा उल्लेख करत युरोपमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट पाकिस्तानातच रचला जातो, असा आरोप करत काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने चर्चा करुन यावर शांततेत तोडगा काढला पाहिजे, असे ते म्हणाले.

'कलम ३७० रद्द करून नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचे स्वप्नच पूर्ण केले'