पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Brexit Day : 'ही युरोपसाठी नवी सकाळच'

युनायटेड किंगडम (UK) आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता युरोपीय महासंघातून बाहेर पडला.

UK युरोपीय संघापासून वेगळे होण्याचे युरोपीय संघाच्या तीन प्रमुखांनी स्वागत केले आहे. युरोपीय संघासाठी ही एक नवीन सकाळ असल्याची भावना प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली आहे. युरोपीय संघ परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकल, युरोपीय आयोगाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन आणि युरोपीय संसदचे अध्यक्ष डेविड सास्सोली यांनी खुल्या पत्राच्या माध्यमातून UK सोबतचे नवे संबंध सलोख्याचे राहतील यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त केलाय.  

Economic Survey: पुढील ५ वर्षांत ४ कोटी लोकांना चांगल्या पगाराची नोकरी

शुक्रवार, ३१ जानेवारी २०२० रोजी युनायटेड किंगडम (UK) आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता युरोपीय महासंघातून बाहेर पडला. यासोबत ते सर्व राजकीय संस्था आणि एजन्सीजमधूनही  बाहेर पडले आहेत. त्यांच्यासाठी पुढील ११ महिन्यांचा कालावधी हा ट्रान्झिशन पिरेडचा असेल. या ट्रान्झिशन पिरेडमध्ये म्हणजेच संक्रमण काळात UK ला युरोपीय महासंघाच्याच नियमांचं पालन करावे लागणार आहे. 

निर्भयाच्या आईला दोषींच्या वकिलांनी दिले आव्हान, म्हणाले...

संक्रमण काळात युके युरोपीयन कोर्ट ऑफ जस्टिसच्या निर्णयांना बांधिल राहिल. कुठल्याही कायदेशीर वादावर युरोपीयन कोर्टाचा निकाल अंतिम राहणार आहे.  युरोपीय महासंघाच्या परिषदांमध्ये UKला यापूढे सहभागी होता येणार नाही. खास निमंत्रण मिळाले तरच युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन भविष्यात एखाद्या परिषदेला उपस्थित राहू शकतील. 

१. व्यापार धोरण बदलणार
UK जगातील इतर राष्ट्रांसोबत वस्तू आणि सेवांच्या व्यापाराविषयी नवीन नियम आखू शकते पण ट्रान्झिशन पिरेड संपेपर्यंत त्यांना याची अंमलबजावणी होणार नाही.

२. EU सोबतदेखील नवे व्यापार नियम
याशिवाय EU सोबतदेखील नवे व्यापार नियम आखावे लागणार आहेत. जेणेकरून ट्रान्झिशन पिरेड संपल्यानंतर UK च्या नागरिकांना कुठलंही अतिरिक्त शुल्क भरावं लागू नये.

३. UKच्या पासपोर्टचा रंग बदलणार
ब्रेक्झिटनंतर UK आपल्या पासपोर्टचा रंगही बदलणार आहे.  निळा रंग पुन्हा लागू करण्यात येणार असून सर्व पासपोर्ट बदलण्यासाठी जवळपास सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे.

४. ब्रेक्झिट नाणी
ब्रेक्झिटच्या स्मृतीप्रित्यर्थ ५० पेनीची (UKचे ३० पैसे) जवळपास तीस लाख नाणी शुक्रवारी चलनात येतील. यावर ३१ जानेवारी ही तारीख असणार आहे. 

५. युरोपीय महासंघात वास्तव्य करणे आणि नोकरी करणे
ट्रान्झिशन पिरेडमध्ये EUमध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे. म्हणजेच EUमधल्या कुठल्याही राष्ट्रात वास्तव्य आणि नोकरी करणारे यापुढेही करू शकतील. त्याचप्रमाणे युरोपीय महासंघातील कुठल्याही राष्ट्राच्या नागरिकाला UKमध्ये नोकरी करण्याचं आणि वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य असेल.