पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; ६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; ६ जणांचा मृत्यू (ANI)

उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात फटाके तयार करणाऱ्या एका कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट मिरेहची परिसरात झाला. सध्या स्फोटामागचे कारण समजलेले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंजाबच्या बटाला भागात एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला होता. त्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला होता आणि १५ जण गंभीर जखमी झाले होते. 

स्फोट इतका शक्तीशाली होता की, संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरु आहे. जेसीबीच्या साहायाने दगड, विटांचा ढिगारा बाजूला केला जात आहे. सध्या ६ लोकांचे मृतदेह हाती लागले असून दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत सापडले आहेत.

लाजिरवाणे ! हुंड्यासाठी निवृत्त न्यायाधीशाकडून सुनेला मारहाण

दरम्यान, पंजाबमधील बटाला येथे ४ सप्टेंबरला एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे २३ जणांचा मृत्यू झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बटाला प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २-२ लाख रुपये तर गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५-२५ हजारांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली होती.