पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना क्वारंटाईन वॉर्डसजवळ पशू-पक्षी येऊ देऊ नका, अन्यथा...

ज्या ठिकाणी हे विलगीकरण कक्ष आहेत. त्या इमारतीभोवती स्वतंत्र तात्पुरती सुरक्षा भिंत उभारण्यात यावी.

कोविड १९ आजार झालेल्या आणि विलगीकरण करून ठेवलेल्या रुग्णांच्या ठिकाणी (क्वारंटाईन वॉर्डस) जर पशू-पक्षी येत असतील तर त्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण आणखी पसरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या संदर्भात सर्व राज्यांना निर्देश जारी केले आहेत. रविवारी हे निर्देश जारी करण्यात आले.

कोविड १९ आजार झालेल्या रुग्णांना सध्या चाचणीनंतर विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. या विलगीकरण कक्षाची व्यवस्था राज्य सरकारने, स्थानिक प्रशासनाने वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे. पण या कक्षांजवळ पशू-पक्षी यांना अजिबात येऊ देऊ नये. त्याचबरोबर या कक्षांजवळ सुरक्षारक्षक नेमण्यात येऊन तिथे डॉक्टर्स, नर्स यांच्याशिवाय अन्य कोणत्याही माणसाला अजिबात प्रवेश करू देऊ नये, असे सरकारने म्हटले आहे.

ज्या ठिकाणी हे विलगीकरण कक्ष आहेत. त्या इमारतीभोवती स्वतंत्र तात्पुरती सुरक्षा भिंत उभारण्यात यावी. त्यामुळे या इमारतीच्या परिसरात कुत्रा, माकड, मांजर असे प्राणी येणार नाही. त्याचबरोबर कबुतरे, कावळे, चिमण्या असे पक्षीही त्या ठिकाणी येऊ नयेत, यासाठी व्यवस्था करण्यात यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.