पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी हवाई रुग्णवाहिका पाठविण्यास तयार

मेहुल चोक्सी

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सी याच्याकडून न्यायालयाची दिशाभूल केली जात असल्याचे या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. मेहुल चोक्सी हा उपचारांचे कारण पुढे करीत चौकशीला सामोरे जाण्यास टाळाटाळ करीत असल्याचे संचालनालयाने म्हटले आहे. 

मेहुल चोक्सी याला भारतात आणले गेल्यास त्याला उपचारांसाठी देशात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इतकेच नाही तर एंटीगुआ येथून त्याला भारतात आणण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल, असे सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयात सांगितले. पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत मेहुल चोक्सी याने तपासात सहकार्य केलेले नाही. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याचबरोबर इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. पण त्याने उपचारांचे कारण पुढे करीत भारतात परतण्यास नकार दिला होता. 

GST चा फायदा ग्राहकांना न दिल्यास कंपन्यांना १० टक्के दंड

मेहुल चोक्सी याच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना त्याने उपचारांसाठी देश सोडल्याचे सांगण्यात आले होते. उपचारांसाठीच ते एंटीगुआ येथे गेले आहेत, असे न्यायालयाला सांगण्यात आले आहे.

१३४०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयकडून मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:enforcement directorate tells mumbai court to provide an air ambulance to bring mehul choksi from antigua to india