पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांना दुसरा धक्का, ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी

पी चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) त्यांच्याविरोधात 'लुकआऊट नोटीस' जारी केली आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यासमोरील संकटात वाढ झाली आहे. 

INX मीडिया घोटाळाः सुप्रीम कोर्टाकडूनही चिदंबरम यांना दिलासा नाही

दरम्यान, उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सीबीआयची टीम त्यांच्या घरी दाखल झाली होती. मात्र पी. चिदंबरम घरी उपस्थित नसल्यामुळे सीबीआयची टीम निघून गेली. त्यानंतर ईडीची टीम देखील त्यांच्या घरी दाखल झाली होती. 

काहीही झालं तरी आम्ही चिदंबरम यांच्या पाठीशीः प्रियांका गांधी

दरम्यान, चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकेच्या आदेशास स्थगिती देण्यास नकार देत त्यांच्या जामिनावर आता सरन्यायाधीश रंजन गोगोई निर्णय घेतील असे म्हटले आहे. हे प्रकरण आता सरन्यायाधीशांकडे पाठवत आहे, असे या प्रकरणाची सुनावणी करत असलेले न्या. एन व्ही रमण्णा यांनी म्हटले. त्यांनी चिदंबरम यांच्या वकिलांच्या टीमला सर्व औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.