पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३५४ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीला अटक

रतुल पुरी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा आणि मॉजरबेअर कंपनीचा माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याला सीबीआयने मंगळवारी अटक केली. ३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी रतुल पुरी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने याबाबत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सोमवारी सीबीआयने ६ ठिकाणांवर छापा टाकले. 

हाय अलर्टः ISI एजंटसह देशात चार दहशतवादी घुसले

सीबीआयने ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये पुरी याच्याशिवाय कंपनीचे मुख्य संचालक, त्यांचे वडील दीपक पुरी, संचालक नीता पुरी (रतुल यांची आई आणि कमलनाथ यांची बहीण), संजय जैन आणि विनित शर्मा यांचा समावेश आहे. या सर्वांवर षडयंत्र रचणे, फसवणूक करणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. बँकेने सांगितले की, रतुल यांनी २०१२ मध्ये कार्यकारी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचे आई-वडील संचालक मंडळात कायम होते. 

याप्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने तक्रार दाखल केली होती. कंपनीने २००९ पासून विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. अनेकवेळा परतफेडीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले होते, असे बँकेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बँकेची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

मनमोहन सिंग यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड

दरम्यान, रतुल पुरी हे ३६०० कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी निगडीत मनी लाँड्रिंग खटल्याचा सामना करत आहे. आता त्याला बँक घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. रतुल पुरी आणि कमलनाथ कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.