पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना ED कडून अटक

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया विषयात परदेशी निधी गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक केली. याच प्रकरणी चिदंबरम यांना सीबीआयने आधीच अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत. तिथेच त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर ईडीच्या तीन सदस्यांच्या समितीने चिदंबरम यांची चौकशी सुरू केली. ईडीचे उपसंचालक महेश शर्मा हे या समितीचे नेतृत्त्व करीत आहेत.

'भाजपचे संकल्पपत्र म्हणेज निव्वळ गाजरांचा पाऊस'

ईडीच्या अटके संदर्भात आमच्याकडे अजून कोणतेही निर्देश आलेले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरच चिदंबरम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल, असे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार यांनी चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी ईडीला दिली आहे. त्याचबरोबर चौकशीनंतर गरज पडल्यास चिदंबरम यांना अटक करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. चिदंबरम यांची पत्नी नलिनी आणि मुलगा कार्ती हे दोघेही बुधवारी सकाळी तिहार तुरुंगाच्या इमारतीमध्ये त्यांना भेटण्यासाठी आले होते.

मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटविण्यासाठी भाजपकडून कलम ३७०चा वापर - पवार

मनी लाँड्रिंग नियंत्रण कायद्याचा जर चिदंबरम यांनी भंग केला असेल, तर त्यांना अटक केली जाऊ शकते, असे न्यायालयाने आपला निकाल देताना म्हटले आहे. या प्रकरणी चिदंबरम यांच्या वकिलांनी दाखल केली फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळली. दरम्यान, चिदंबरम यांची तुरुंगातून लवकर सुटका होऊ नये, म्हणून सीबीआय आणि ईडीने कट रचला असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी केला.