पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नौशेरात दहशतवाद्यांबरोबर चकमक, एक भारतीय अधिकारी शहीद

नौशेरात दहशतवाद्यांबरोबर चकमक, एक भारतीय अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्काराच्या चौकीवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारात लष्कराच्या एका ज्यूनिअर कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) शहीद झाला आहे. दहशतवाद्यांनी एलओसीच्या ५०० मीटर आत हा गोळीबार केला आहे. संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

सीमारेषेवर शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतरच पाकिस्तानने हे कृत्य केले आहे. पाकने मंगळवारी एलओसीवर बालाकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी रविवारी पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारताचे दोन जवान शहीद आणि एक नागरिकाचा मृत्यू झाला होता.