पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाम येथे शोध मोहीम करताना जवान

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या कुलगाव जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. 

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे शक्य नाही: केंद्र सरकार

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील हरमंद गुरी गावातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशनला सुरु केली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. 

कोरोनाशी लढा, कोर्टाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. जवानांकडून घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरु आहे. याआधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करुन सांगितले की, 'हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांची हत्या केली होती.'

अमेरिकेत कोरोनामुळे एका दिवसात १,४८० नागरिकांचा मृत्यू