पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनंतनाग चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरः दहशतवाद्यांबरोबर चकमक (ANI)

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. सध्या जवानांकडून शोध मोहिम सुरु आहे. या चकमकीमध्ये एक जवान जखमी झाला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बिजविहाराच्या पाजलपुरा गावात ही चकमक झाली.

२४ तासात पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पाजलपुरा गावामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरु केली. भारतीय जवान, सीआरपीएफ आणि पोलिसाची संयुक्त कारवाई केली. दरम्यान, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला आणि चकमक सुरु झाला. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आहे. हे दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे असून ठार झालेल्यांमध्ये कमांडर नसीर चादरु याचा देखील समावेश आहे.

त्यांचा कारभार वांझोटा तर यांचा खोटेपणाचा; 'राज' की बात

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवत गुप्तचर विभागाने हाय अलर्ट जारी केला होता. त्यामुळे जवानांकडून जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात शोध मोहिम सुरु आहे. ५ ऑक्टोबरला होणाऱ्या ब्लॉक विकास परिषदेच्या (बीडीसी) निवडणुकीत अडथळा आणण्यासाठी दहशतवाद्यांनी कारवाया सुरु केल्या आहेत. 

अर्थमंत्री स्वतःच्या पतीचं तरी ऐकणार का?, शरद पवार यांचा सवाल