पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत २०० युनिटपर्यंत वीज मोफत, केजरीवाल यांचा निर्णय

अरविंद केजरीवाल

दिल्लीतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. दिल्लीतील रहिवाशांसाठी २०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर २०१ ते ४०० युनिटपर्यंतच्या वीज वापरावर ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. 

या घोषणेनंतर काही मिनिटांतच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणाले, दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी चांगल्या शिक्षणा आणि आरोग्य सुविधांसोबत किमान वीज पुरवठा आवश्यक आहे. 

दिल्ली वीज नियामक आयोगाने घरगुती वापराच्या वीज ग्राहकांकडून आकारण्यात येणारे स्थिर शुल्क ८४ टक्क्याने कमी करण्याचा निर्णय बुधवारीच घेतला आहे. त्यानंतर लगेचच अरविंद केजरीवाल यांनी २०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला. 

सद्यस्थितीत दिल्लीमध्ये ४९ लाख वीज ग्राहक आहेत. स्थिर आकार कमी केल्यामुळे ९८ टक्के ग्राहकांच्या पैशांची बचत होणार आहे, असे वीज नियामक आयोगाने म्हटले आहे.