पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा निवडणूक इतकी लांबलचक नको, नितीशकुमार यांची मागणी

नितीशकुमार

लोकसभा निवडणुकीचा कालावधी कमी करण्याचा मुद्दा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांमध्ये खूप अंतर आहे. ते कमी करायला हवे, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या सातव्या टप्प्यामध्ये नितीशकुमार यांनी रविवारी पाटणामध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

माजी PM इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे माझी हत्या केली जाईल: केजरीवाल

यंदा लोकसभेची निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये होत आहे. त्यातील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज, रविवारी होते आहे. येत्या गुरुवारी, २३ मे रोजी मतमोजणी होईल. ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. त्यानंतर १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील, २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील, २९ एप्रिलला चौथ्या टप्प्यातील, ६ मे रोजी पाचव्या टप्प्यातील, १२ मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. मतदानाच्या दोन टप्प्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त अंतर असल्याचा मुद्दा नितीशकुमार यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचा कालावधी जास्त आहे. त्याचबरोबर दोन टप्प्यांमधील अंतरही गरजेपेक्षा जास्त आहे. ते कमी केले गेले पाहिजे. यासाठी राजकीय पक्षांमध्ये एकमत तयार व्हावे म्हणून आपण सर्वच राजकीय पक्षांना पत्र लिहिणार आहोत, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

वायफळ बोलण्यापेक्षा मौनात ताकद, संजय राऊत यांचे मोदींना समर्थन

बिहारमधील ८ जागांसाठी आज मतदान होते आहे. राजधानी पाटणामध्येही आजच मतदान होते आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण नऊ टप्प्यांमध्ये मतदान झाले होते.