पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आचारसंहिता उल्लंघन प्रकरणातून पंतप्रधान मोदींना क्लिनचीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्धा येथील प्रचार सभेत केलेल्या भाषणात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून निवडणूक आयोगाने मोदींना क्लिनचीट दिली आहे. केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निर्णयावरून ‘कॉंग्रेस नेत्यांनी अल्पसंख्याकबहुल भागात आश्रय घेतला आहे, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथे १ एप्रिल रोजीच्या प्रचारसभेत केले होते.

यासंदर्भात कॉंग्रेसने ५ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या आणखी चार तक्रारी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. वर्धा येथील प्रचार सभेतील भाषणात मोदींनी आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने त्यांना क्लिनचीट दिली. 

 

मोदी आणि शाह हे निवडणूक प्रचारामध्ये भारतीय लष्कराचा वापर करत आहेत, अशी तक्रार काँग्रेसने केली होती. याप्रकरणी स्पष्टिकरण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निवडणूक आयोगाला दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निवडणूक आयोगाला आपले म्हणणे मांडण्यासाठी २ मेपर्यंतची मुदत दिली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Election Commission Says PM Narenda Modi Did Not Violate Model Code Of Conduct Speech In Wardha Maharashtra