पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद, निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

केंद्रीय निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेत असून, यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. पुढील महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याबद्दल उत्सुकता होती. याच आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मुंबईत येऊन गेले होते. त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा यावेळी घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली होती. 

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम एकत्र जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात की दोन टप्प्या मतदान होते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात दिवाळी असल्यामुळे मतदान आणि मतमोजणी नक्की कधी होणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर लगेचच राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Election Commission of India to announce dates for Maharashtra and Haryana assembly elections at noon today