पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी-शाह यांना क्लिनचीट, राहुल गांधींना मुदत वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वादग्रस्त भाषणाच्या आरोपातून निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा क्लिनचिट दिली. शुक्रवारी निवडणूक आयोगाने मोदी यांच्यावरील तीन प्रकरणातील निर्णय दिला. मोदी यांच्यासह आयोगाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही एका प्रकरणातून क्लिनचीट दिली आहे.  दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आचारसंहिता उल्लंघन प्रकरणातील स्पष्टीकरणासाठीची मुदत वाढवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 एप्रिलला वाराणसीमधील प्रचार सभेतील भाषणात आणि 26 एप्रिलला 'आजतक' या टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीसंदर्भात काँग्रेसचे नेता रणदीप सुरजेवाला यांनी तक्रार दाखल केली होती. याशिवाय महाराष्ट्रातील नांदेडमधील प्रचारसभेतील भाषणात मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

या तिन्ही आरोपातून निवडणूक आयोगाने मोदींना क्लिनचीट दिली. यापूर्वी आयोगाने तीन प्रकरणातून मोदींना क्लिनचीट दिली होती. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या विरुद्ध 22 एप्रिलला पश्चिम बंगालमधील प्रचारसभेत आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती.