पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक आयोगाचा दणका; अनुराग ठाकूर यांना प्रचार करण्यास बंदी

अनुराग ठाकूर

दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अनुराग ठाकूर आणि खासदार परवेश वर्मा यांच्याविरोधात कारवाई केली आहे. अनुराग ठाकूर यांच्यावर ७२ तासांसाठी म्हणजे तीन दिवसांसाठी प्रचारात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. तर परवेश वर्मा यांच्यावर ९६ तासांसाठी म्हणजे ४ दिवसांसाठी बंदी घातली आहे.

कोरोना विषाणू: केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा यांनी प्रचारा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने दोघांविरोधात कारवाई केली आहे. दरम्यान, या आधी सुध्दा निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा यांच्याविरोधात कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने भाजपला दोघांची नावं दिल्ली विधानसभा निवडणूक स्टार प्रचारकांच्या यादीतून काढण्यास सांगितले होते. 

जामिया परिसरात इतरांच्या दिशेने पिस्तूल रोखत तरुणाची दहशत

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान एका प्रचार सभेला संबोधित करताना अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारो को गोली मारों' असे वक्तव्य केले होते. निवडणूक आयोगाने भाजप खासदार परवेश वर्मा यांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. निवडणूक आयोगाने त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी ३० जानेवारी दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. 

...म्हणून दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली: सुधीर मुनगंटीवार