पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक आर्थिक मंदीचा भारतावरही परिणामः आयएमएफ प्रमुख

ख्रिस्तिलिना जॉर्जिवा (Bloomberg)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) नव्या प्रमुख ख्रिस्तिलिना जॉर्जिवा यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा मागील एक दशकातील नीचांकावर आला असल्याचे म्हटले आहे. याचा परिणाम भारतासारख्या उभारी घेत असलेल्या बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसत असल्याचेही त्या म्हणाल्या. व्यवस्थापकीय संचालकाचा पदभार घेतल्यानंतर आयएमएफच्या पहिल्याच बैठकीत त्या बोलत होत्या.

दर महिना ५५ रुपये जमा केल्यास मिळेल ३६००० रुपयांची पेन्शन

आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ५ टक्क्यांवर पोहोचला होता. नुकताच आरबीआयने या आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज ६.९ टक्क्यांवरुन कमी करुन ६.१ टक्के केला आहे. घटत्या वृद्धी दरावर लगाम लावण्यासाठी सरकार आणि आरबीआयकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही जागतिक अर्थव्यवस्थेतील मरगळीपासून भारत लांब राहू शकलेला नाही.

रेपो दरात पुन्हा पाव टक्का कपात, कर्जे आणखी स्वस्त

जॉर्जिवा म्हणाल्या की, दोन वर्षांपूर्वीपर्यंत जगाची अर्थव्यवस्था सकारात्मक दिशेने पुढे जात होती. जीडीपी आकडेवारीनुसार जागतिक अर्थव्यवस्था ७५ टक्के वेगाने विकास करत होती. पण व्यापार युद्धामुळे यावर नकारात्मक परिणाम पडला. या वादामुळे जागतिक व्यापाराचा विकास दर थांबला. व्यापार युद्धात सामील असलेल्या देशांशी चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले. कारण याचा जागतिक परिणाम होतो आणि यापासून कोणीही वाचू शकत नाही. 

अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशांमधील बेरोजगारी दर सार्वकालिक नीचांकावर आहे. जपान आणि यूरोपच्या अन्य देशांमध्ये आर्थिक उलाढाल कमी झाली आहे. तर भारत आणि ब्राझीलसारख्या बाजारांवर याचा थेट परिणाम झाल्याचे दिसत आहे.

'या' रेल्वेला एक तास उशीर झाल्यास प्रवाशांना मिळतील १००-१० रुपये

आयएमएफनेही २०१९-२० साठी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दराचा अंदाज घटवला. संभाव्य विकास दरात ०.३० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आयएमएफने विकास दर आता ७ टक्के केला आहे.