पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : ईडीने मृत साक्षीदाराला २४ तासांत केलं जिवंत

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील चौकशीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) भोंगळ कारभार समोर आला आहे.  मंगळवारी जो साक्षीदार मृत असल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी केला होता. तो  साक्षीदार जिवंत असल्याची माहिती ईडीने बुधवारी दिल्लीतील न्यायालयासमोर सांगितली.  दिल्लीच्या न्यायालयात अंमलबजावणी संचालनालयाने सूत्रांचा हवाला देत केके खोसला पुढील एक-दोन दिवसांत चौकशीसाठी उपस्थित राहू शकतील अशी माहिती दिली. 

कोर्ट अन् निवडणूक आयोगाकडून कोणतीही अपेक्षा नाही : राज ठाकरे

उल्लेखनिय आहे की, २४ तासांपूर्वी केलेल्या युक्तीवादामध्ये बदल करत मृत साक्षीदाराला जिवंत असल्याचा दावा ईडीने केला.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाचा रुतुल पुरीने ३ हजार ६०० डील प्रकरणातील साक्षीदार केके खोसला यांची हत्या करण्यात आली असेल, असा दावा ईडीचे वकील डीपी सिंह यांनी मंगळवारी न्यायालयात केला होता. 

तिहेरी तलाक विरोधी विधेयक असंविधानिक : असुदुद्दीन ओवेसी

याप्रकरणातील युक्तीवादामध्ये ईडीचे वकील डीपी सिंह म्हणाले होते की, रतुल पुरी प्रभावशाली व्यक्ती आहे. तो फक्त फरार होण्याच्या मार्गावर नसून आम्हाला भीती आहे की एका साक्षीदाराची हत्याही झाली असेल. यावेळी त्यांनी चार्टट अकाउंटट खोसला यांचा दाखला दिला होता. मात्र त्यानंत बुधवारी सूत्रांचा हवाला देत खोसला चौकशीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिल्लीतील न्यायालयासमोर दिली.