पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राणा कपूर-प्रियांका गांधी यांच्यातील 'तो' व्यवहार ईडीच्या रडारवर

राणा कपूर यांनी प्रियांका गांधींकडून खरेदी केलेली महागडी पेंटिंग ईडीकडून जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना विकलेले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पेंटिंग जप्त केले आहे. जून २०१० प्रियांका गांधी यांनी राणा कपूर यांच्यासोबत पेंटिंगचा २ कोटीचा व्यवहार झाल्याची एका पत्राच्या माध्यमातून पुष्टी केली होती. पत्रात त्यांनी पेंटिंग खरेदी केल्याबद्दल राणा कपूर यांचे आभारही मानले होते.  

राणा कपूर यांनी एका पेंटिंगसाठी प्रियांका गांधींना दिले होते २ कोटी

येस बँक संकटात आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि राणा कपूर यांच्यात पेंटिंगचा कोट्यवधीचा व्यवहार झाल्याचे समोर आले होते. येस बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राणा कपूर यांना अटक केली असून त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर गैरव्यवहारात सामील असल्याचा संशय असताना आता पेंटिंगसंदसर्भातील व्यवहारामुळे प्रियांका गांधी यांचे नाव चर्चेत आले आहे.  

कमलनाथ यांच्या राज्यात 'ऑपरेशन लोटस'ची तयारी?

प्रियांका गांधी यांनी केलेला व्यवहार हा धनादेशाच्या (चेक) स्वरुपात केल्याचे यापूर्वी काँग्रेसने स्पष्ट केले होते. यासाठी आवश्यक तो करही भरला आहे, असेही त्यांनी सांगितले होते. पेंटिंग जप्त केल्यानंतर ईडी याप्रकरणाचा पुढील तपास कशाप्रकारे करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर ईडीने ईडीने शनिवारी वरळीतील राणा कपूर यांच्या 'समुद्र महल' या  निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने तब्बल ३० तासाच्या चौकशीनंतर रविवारी पहाटे राणा कपूर यांना मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक केली. मुंबईच्या विशेष न्यायालयाने ११ मार्चपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावली आहे. चौकशीमध्ये ते सहकार्य करत नसल्याचे समोर येत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ED seizes the painting of former PM Rajiv Gandhi bought by Yes Bank founder Rana Kapoor from Priyanka Gandhi Vadra