पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची ईडीकडून चौकशी

फारुक अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांची आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा प्रकरणामध्ये त्यांची ईडीने चौकशी केली असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फारुक अब्दुल्ला यांना ईडीने चंडीगढ येथील कार्यालयामध्ये दुपारी साडेबारा वाजता चौकशीसाठी बोलवले होते. याआधी याच प्रकरणामध्ये सीबीआयने मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांची चौकशी केली होती. याप्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे.

कोर्ट अन् निवडणूक आयोगाकडून कोणतीही अपेक्षा नाही : राज ठाकरे

सीबीआयने जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला आणि तीन जणांविरोधात श्रीनगर येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने क्रिकेट असोसिएशनचे तत्कालिन अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, तत्कालिन महासचिव मोहम्मद सलीम खान, तत्कालिन कोषाध्यक्ष अहसान अहमद मिर्जा आणि बँकेचे कर्माचारी बशीर अहमद मिसगर यांच्याविरोधात गुन्ह्याचा कट रचण्याचा आणि विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.

तिहेरी तलाक विरोधी विधेयक असंविधानिक : असुदुद्दीन ओवेसी

दरम्यान, 2015 मध्ये जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या 113 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. बीसीसीआयने 2002 ते 2011 च्या दरम्यान जम्मू-काश्मीर राज्य क्रिकेट सुविधांच्या विकासासाठी 112 कोटी रुपये दिले होते. सीबीआयने आरोप लावला आहे की, आरोपींनी यामधील 43.69 कोटी रुपये हडपले.

करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू 15 जण गंभीर