राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने दाखल केल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळल्याचे पाहायला मिळाले. पवारांविरोधातील कारवाईचे पडसाद बिहारमधील पाटणामध्ये देखील उमटल्याचे पाहायला मिळाले. मोदी-शहा यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून कार्यकर्त्यांनी
शरद पवारांनी शिवसेनेचेही मानले आभार
शुक्रवारी शरद पवार मुंबईतील ईडीच्या कार्यालयात जाणार होते. त्यांच्या समर्थनार्थ ईडीच्या कार्यालय परिसरात जमावबंदी लागू केल्यानंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी पवारांविरुद्धच्या कारवाईविरोधात निषेध नोंदवला.
... म्हणून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला : शरद पवार
मुंबईसह राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळून सामान्य माणसाला त्रास होऊ नये, या उद्देशाने पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याची आपली भूमिका बदलली. मुंबई पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांच्या विनंतीनंतर ईडीच्या कार्यालयात जाणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले होते.