पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SC च्या निकालानंतर ठरणार कर्नाटकमधील पोट निवडणुकीचा मुहूर्त!

सर्वोच्च न्यायालय

कर्नाटक विधानसभेतील पोट निवडणुकीसंदर्भात निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. कर्नाटकातील १७ बंडखोर आमदारांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपासून सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

 अण्णांकडून पवारांना क्लीनचीट; चौकशीची केली मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत पोट निवडणुकीबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. उल्लेखनिय आहे की, कर्नाटक विधानसभा सभापती के. आर. रमेश कुमार यांनी विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होईपर्यंत १४ आमदारांना अपात्र घोषित केले होते. यात काँग्रेसच्या ११ तर जेडीएसच्या तीन आमदारांचा समावेश होता. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर  बी एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले आहे. 

एका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय?

कर्नाटक विधानसभेत एच डी कुमारस्वामी विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले. सभागृहात त्यांना ९९ विरुद्ध १०५ मतांनी अपयश आले. त्यानंतर अपात्र घोषित करण्यात आलेल्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.