पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EC कडून मोदींना दिलासा, राजीव गांधी यांच्यावरील टिप्पणीवरही क्लिनचीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासंदर्भात भ्रष्टाचारी नंबर 1 अशी टिप्पणी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट मिळाली आहे. राजीव गांधींचा कार्यकाळ मिस्टर क्लीन म्हणून सुरू झाला असला तरी त्यांचा अंत भ्रष्टाचारी नंबर 1 या रूपात झाला, असे वक्तव्य नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमधील प्रचार सभेत केले होते. 

मोदींच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीने असं विधान करणं हा पंतप्रधान पदाचाच अपमान आहे, असं काँग्रेसने म्हटले होते. मात्र, निवडणूक आयोगाने मोदी यांनी आपल्या भाषणातून आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही, असे म्हटले आहे. 

आचारसंहिता उल्लंघन प्रकरणातून पंतप्रधान मोदींना क्लिनचीट

लोकसभा प्रचारादरम्यान आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणातील मोंदीना निवडणूक आयोगाकडून मिळालेली ही सातवी क्लिनचीट आहे. यापूर्वी सहा प्रकरणात निवडणूक आयोगाने मोदींना क्लिनचीट दिली होती.  
 

मोदी-शाह यांना क्लिनचीट, राहुल गांधींना मुदत वाढ