पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूर्व कमांड लष्कर प्रमुख म्हणाले, आता चीनची दादागिरी चालणार नाही

पूर्व कमांडचे लष्कर प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल एम एम नरवणे

पूर्व कमांडचे लष्कर प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल एम एम नरवणे यांनी चीनला चेतावणी दिली आहे. सध्याच्या घडीला भारतीय लष्कराची ताकत ही भारत-चीन यांच्यात १९६२ मध्ये झालेल्या युद्धावेळीसारखी नाही, हे चीनने लक्षात घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी  नरवणे यांनी 'भारत चेंबर ऑफ कॉमर्स' या कार्यक्रमात 'डिफेंडिंग अव्हर बॉर्डर' या विषयावर संवाद साधला.  

'श्वासही घेऊ शकत नाही', ट्रम्प यांनी हवामान बदलाचे खापर भारतावर फोडले

यावेळी ते म्हणाले, भारत-चीन यांच्यातील वादग्रस्त क्षेत्रात जर चीनने १०० वेळा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असेल तर भारताने २०० वेळा त्याच्यावर अतिक्रमण केले आहे. भारतीय सेना आता १९६२ सारखी नाही, हे चीनने ध्यानात ठेवायला पाहिजे. डोकलामचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी चीनवर निशाणा साधला. डोकलामप्रश्नी चीन आणि भूतान यांच्यात वाद सुरू आहे. या मुद्यावरुन भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी जूनपासून तणाव निर्माण झाला होता.

'आम्हाला चीनची गरज नाही', डोनाल्ड ट्रम्प भडकले

त्यानंतर डोकलामबाबत सध्या तरी गंभीर संकट दिसत नाही. भारत आणि चीन यांच्यातील संबंध डोकलामपूर्व पातळीवर आले आहेत, असे भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केले होते. १९६२ नंतर भारताने कोणता धडा घेतला आणि यावर काय उपाय योजना केल्या याप्रश्नाते उत्तर देताना नरवाने म्हणाले की, सध्याच्या घडीला आपली सेना १९६२ सारखी नाही. जर चीन आम्हाला इतिहासाचे दाखले देत असले तर त्यांना याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले.  २०१७ मध्ये डोकलाम मुद्यावरील तणावादरम्यान चीन कडून कोणतीही तयारी दिसत नव्हती. भारतीय सेना १९६२ पेक्षा अधिक मजबूत झाली आहे. त्याचेत हे संकेत होते. आता चीनची दादागिरी चालणार नाही, असेही ते म्हणाले.