पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली, एनसीआरला २४ तासांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का

भूकंप मापनाचे छायाचित्र

दिल्ली आणि एनसीआरला सोमवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. मागील २४ तासांत दुसऱ्यांदा दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ही २.७ नोंदवण्यात आली आहे. दुपारी दीडच्या सुमारास हा भूकंप झाला. यापूर्वी दिल्ली आणि परिसरात रविवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक आपल्या घराबाहेर आले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार

दरम्यान, रविवारी दिल्लीनजीक असलेल्या नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे घाबरलेले लोक घराबाहेर निघाले. काहीजण गॅलरीत उभे राहिले. भूकंपाचा हा धक्का ३.५ रिश्टर स्केल इतका होता.

लॉकडाऊनमध्ये ३२ कोटी गरीबांना मिळाले २८२५६ कोटी रुपये

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतच ८ किमी खोल होता. आयएमडीच्या मते, पूर्व दिल्लीत भूकंपाचे केंद्र होते. लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घराबाहेर पडल्यानंतरही त्यांच्यासमोर धोका होता.