पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के

भूकंप मापनाचे छायाचित्र

जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर सोमवारी भूकंपाचे धक्के बसले. हिमाचल प्रदेशच्या चंबा येथे दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ५.० रिश्टर स्केल ऐवढी होती. भूकंपाच्या धक्क्यामुळे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये काहीच नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र अर्ध्या तासात दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. पांगी, चंबा, कांगडा यांच्यासह लाहुल-स्‍पीति जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले.

सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या काही भागात आणि हिमाचल प्रदेशच्या चंबा येथे भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचे धक्के बसल्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. रविवारी देखील या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसले होते.  रविवारी चंबा येथे दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले होते. भूकंपामुळे अद्याप काही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरच्या सीमेवर चंबा येथे होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:earthquake with a magnitude 5-0 on the richter scale hit Jammu and Kashmir Himachal Pradesh Border