पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली, एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

भूकंप

दिल्ली, एनसीआरमध्ये आज (रविवार) सायंकाळी ५.५० च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीनजीक असलेल्या नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे घाबरलेले लोक घराबाहेर निघाले. काहीजण गॅलरीत उभे राहिले. भूकंपाचा हा धक्का ३.५ रिश्टर स्केल इतका असल्याचे सांगण्यात येते. 

भारताच्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी ठार

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतच ८ किमी खोल आहे. आयएमडीच्या मते, पूर्व दिल्लीत भूकंपाचे केंद्र होते. लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घराबाहेर पडल्यानंतरही त्यांच्यासमोर धोका होता. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी टि्वट केले. अपेक्षा आहे की, सर्वजण सुरक्षित असतील. आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असे त्यांनी टि्वट केले आहे.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८३५६ वर, १२७ रुग्णांना डिस्चार्ज

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Earthquake tremors in Delhi NCR on sunday amid Coronavirus Lockdown people moved out of homes