पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली शहरातील विविध भागात भूकंपाचे धक्के

 या भूकंपाची तीव्रता ५. ३ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे.

दिल्ली शहरातील काही भागात मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान भूकंपाचे धक्के बसल्याचे वृत्त आहे. दिल्लीसह उत्तराखंड आणि लखनऊ देखील भूकंपाने हादरले. दिल्लीत ७ वाजून ५ मिनिटांनी भूंकपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५. ३ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे. भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. 

प्रदूषणाच्या मुद्यावर राजकारण करुन जिंकणं 'मुश्किल' : गंभीर

भूकंपाच्या धक्यानंतर नागरिकांनी घरातून पळापळ केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत नुकसानीचे काही वृत्त अद्याप समोर आलेले नाही. यापूर्वी सोमवारी गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. उत्तराखंडमधील कुमाऊ परिसरातील पिथॉरागड, अल्मोडा. चंपावत आमि बागेश्वर यासह अन्य भागात मंगळवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राज्यातील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये भूकंपाची तीव्रता ४. ५ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे. या ठिकाणी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी भूंकप झाला.