पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरले

दिल्लीत भूकंपाचे धक्के

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. ५० सेकंद या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बसताच घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल ऐवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदु कुश येथे होता. दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरियाणातील अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

सिंचन घोटाळाः अजित पवारांच्या क्लीनचिटवर फडणवीसांचा आक्षेप

भूकंपाचे धक्के बसताच शहरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली तर कर्मचाऱ्यांनी ऑफिसच्या बाहेर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्यामुळे कपाट, पंखा, कम्प्युटर हालले असल्याचे नागरिकांनी सांगितले. भूकंपाच्या धक्क्यामुळे अद्याप काही नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.  

जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणः चारही दोषींना फाशीची शिक्षा