पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही ७० दिवसांनी काही चिनी रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोना

चीनचा वुहान प्रांत कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू होता. इथून कोरोना विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली, वुहानमध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, इथल्या दैनंदिन गोष्टी हळहळू पूर्वपदावर येत आहेत मात्र आता इथे नवी समस्या समोर आली आहे.

Sars-CoV-2 virus पासून पूर्णपणे बरे झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे  न दाखवता त्यांच्या चाचण्या या ५० ते ७० दिवसांनतरही पॉझिटिव्ह येत आहेत. यामागचं कोडं चिनी डॉक्टरांनाही उलगडत नाहीये.

क्रुझवर अडकलेल्या खलाशांचा मुंबई बंदरावर उतरण्याचा मार्ग मोकळा

काही रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन बाहेर आले आहेत मात्र ७० दिवसांनी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत, काहीचे अहवाल हे ५० ते ६० दिवसांनी देखील पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती इथल्या डॉक्टरांनी दिली आहे.

पुन्हा पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा आकडा किती आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा आकडा कदाचित डझनभर असू शकतो. दक्षिण कोरियातही चार आठवड्यानंतरही बरे झालेल्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. इटलीमध्येही  बरे झालेल्या रुग्णांचे अहवाल काही दिवसांनंतर पॉझिटिव्ह आले असल्याच्या बातम्या  आहेत.रुग्णांमध्ये असं का आढळून येत आहेत, यावर डॉक्टर अधिक संशोधन करत आहेत. 

लॉकडाऊन काळात स्वयंपाकाच्या गॅसच्या मागणीत २० टक्क्यांची वाढ