पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक कोरोनाबाधित रुग्ण कमाल चार जणांपर्यंत संसर्ग पसरवू शकतो, संशोधन

कोरोना विषाणू हवेतही २ ते ३ तास सक्रिय राहू शकतात. (फोट - रॉयटर्स)

चांगल्या स्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एक व्यक्ती केवळ दीड व्यक्तींनाच त्याची लागण करू शकतो. पण त्याचवेळी वाईट स्थितीत हाच एक रुग्ण चार जणांना कोरोना विषाणूची लागण करण्याचीही शक्यता असते, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे. भारतात केलेल्या संशोधनातूनच त्यांनी हे निष्कर्ष काढले आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत.

... या खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी करण्यास मंजुरी

संसर्ग किती वेगाने समाजात पसरतो आहे, याचे मापन करण्यासाठी जी शास्त्रीय पद्धती वापरली जाते. त्याच पद्धतीतून हे संशोधन करण्यात आले आहे. अर्थात या सर्वेक्षणात फेब्रुवारी अखेरपर्यंतचा डेटा गृहित धरण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आता हा आकडा ४०० च्या वर गेला आहे. आतापर्यंत ९ जणांचा देशात या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

या संशोधनानुसार लक्षण दिसायला लागल्यानंतर जर तीन दिवसात एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांना जरी विलगीकरण कक्षात ठेवले तरी त्यामुळे एकूण संसर्गित व्यक्तींचा आकडा कमी व्हायला ६२ टक्क्यांपर्यंत मदत होते.  

राज्यात कोरोनाचा चौथा बळी, मुंबईत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. यामुळे संसर्ग होण्याची शृंखला तुटू शकते. म्हणूनच लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक झाले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.