पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ई-तिकीटांचा काळाबाजार आणि दहशतवाद्यांना मदत करणारी टोळी जेरबंद

ई-तिकीटांचा काळाबाजार

रेल्वेत ई-तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या आणि तो पैसा दहशतवादी टोळक्यांना पुरविणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी टोळीचा म्होरक्या आणि अन्य २७ जणांना अटक करण्यात आली आहे. गुलाम मुस्तफा असे या म्होरक्याचे नाव आहे. या टोळीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून, यातील पैशांचा वापर दहशतवादासाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे.

केंद्राची बाजू ऐकल्याशिवाय CAA ला स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट

रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरूण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून ही टोळी कार्यरत आहे. या टोळीने ई-तिकीटांचा काळाबाजार करण्याच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपये कमावले आहेत. याच कमाईचा वापर दहशतवादाला आर्थिक मदत, रोकड रकमेची अफरातफर यासाठी केला जात होता. टोळीचा म्होरक्या गुलाम मुस्तफा याच्याकडे आयआरसीटीसीचे ५६३ वैयक्तिक ओळखपत्र सापडली आहेत. त्याचबरोबर स्टेट बँकेच्या २४०० आणि ग्रामीण बँकेच्या ६०० शाखांची यादी सापडली आहे. या बँकांमध्ये त्याची खाती असण्याची शक्यता आहे. ई-तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी गुलाम मुस्तफाने एक सॉफ्टवेअरही तयार केले होते, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची, मार्चमध्ये कायदा करणार - देसाई

गुलाम मुस्तफा आणि देशभरात पसरलेल्या जाळ्यातील त्याचे साथीदार ई-तिकीटाच्या माध्यमातून कोणत्याही रेल्वेचे तिकीट तात्काळ बूक करीत होते. यासाठी संबंधित प्रवाशाचे बनावट आधार कार्ड किंवा पॅनकार्डही ते तयार करीत होते. यातून मिळणारा पैसा वेगवेगळ्या तीन हजार खात्यांतून परदेशात पाठविला जात होता. मोठी रक्कम क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दहशतवाद्यांना पाठविली जात होती. गुलाम मुस्तफा बंगळुरूमधून त्याचे काम चालवत असे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचे साथीदार कार्यरत होते.