पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात ई-सिगारेटवर बंदी, एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद

निर्मला सीतारामन

ई-सिगारेटवर बंदी घालण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ई-सिगारेटच्या उत्पादनाला, आयात/निर्यातीला, वाहतुकीला, विक्रीला, साठवणुकीला आणि जाहिरात करण्याला बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

या बंदीचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा एक वर्षापर्यंत तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर उल्लंघन केल्यास तीन वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. ई-हुक्कावरही बंदीच असणार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

या संदर्भात लवकरच सरकार एक अधिसूचना जारी करणार असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातील विधेयक मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आल्यानंतर ई-सिगारेट निर्बंध अधिसूचना २०१९ यातील तरतुदींचे मंत्रिगटाने अवलोकन केले.

अयोध्या प्रकरण : युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी १८ ऑक्टोबरची अंतिम मुदत

दरम्यान, पारंपरिक सिगारेट इतकी ई-सिगारेट घातक नसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.