पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : पोलिस अधिकाऱ्याचा मुका घेणे पडले महागात, एकाला अटक

तरुण पोलिस अधिकाऱ्याचा मुका घेताना

हैदराबादमध्ये तेलंगणामधील प्रसिद्ध बोनालू कार्यक्रमात पोलिस अधिकाऱ्याचा मुका घेणे एका तुरुणाला महागात पडले. सरकारी कामात हस्तक्षेप आणि अधिकाऱ्याचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. हा तरुण एका खासगी बँकेत काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली, त्यावेळी हा तरुण मद्याच्या अंमलाखाली होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडिओत दिसते की रस्त्यावर काही तरुण नाचत आहेत. त्याचवेळी तिथून जात असलेल्या एक पोलिस अधिकाऱ्याचा गालाचा एका तरुणाने मुका घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर पोलिस अधिकाऱ्याने लगेचच त्या तरुणाला दूर केले. 

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यावर तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.