पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला तहसीलदाराला वाचवताना जखमी झालेल्या ड्रायव्हरचा मृत्यू

कार चालक गुरुनाथम

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी महिला तहसीलदाराला जिवंत जाळण्याची घटना घडली होती. या महिला तहसिलदाराला वाचवण्यासाठी गेलेला कारचालक गंभीर जखमी झाला होता. मंगळवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती. तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. अब्दुल्लापुरमेटमध्ये महिला तहसीलदार विजया रेड्डी (३७ वर्ष) यांना त्यांच्याच कार्यालयात जीवंत जाळण्यात आले होते.

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दरवाजे २४ तास खुले : भाजप

न्यायालयाच्या आदेशानंतरही जमिनीच्या कागदपत्रात आवश्यक दुरुस्ती न केल्याने नाराज असलेल्या सुरेश मुदिराजू याने हे कृत्य केले. सुरेशने विजया यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले. यामध्ये तहसीलदाराचा जागीच मृत्यू झाला होता. विजया यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. ज्यामध्ये विजया यांचा कारचालक गुरुनाथम यांचा देखील समावेश होता. या घटनेनंतर तिघांवर देखील उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान कारचालक गुरुनाथम यांचा मृत्यू झाला. 

आमदार फुटण्याची भीती नाही, बाळासाहेब थोरात यांना खात्री

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. राचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश एम. भागवत यांनी सांगितले की, 'आरोपी सुरेशच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. जमिनीच्या कागदपत्रांची देखील तपासणी सुरु आहे. हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीने असे का केले किंवा त्याला हे कोणी करायला सांगितले याचा तपास पोलिस करत आहेत. 

शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊः नवाब मलिक