पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉक्टरांवर हल्ला केल्यास १० वर्षे शिक्षा, केंद्र सरकारकडून कायद्याचा मसुदा तयार

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार

डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि रुग्णालयातील तोडफोड रोखण्यासाठी कायदा करण्यासाठी केंद्र सरकारने विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. यामध्ये आरोप सिद्ध झाल्यास संबंधिताला १० वर्षांपर्यंतची शिक्षा आणि कमाल १० लाख रुपयांचा दंड याची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने तयार केलेला हा मसुदा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवला जाईल. 

पहिले राफेल विमान याच महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

मसुद्यामध्ये किमान सहा महिने शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोप सिद्ध झाल्यास दोषीला किमान ५० हजार रुपयांचा दड भरावा लागणार आहे. आरोपीने केलेली तोडफोड किंवा मारहाण किती गंभीर आहे, यानुसार दंड आणि शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी अशा पद्धतीचा कायदा आणण्याची हिच योग्य वेळ आहे. रुग्णाचे जीव वाचविण्यासाठी डॉक्टर त्यांच्याकडून सर्व प्रयत्न करीत असतात. अशा स्थितीत डॉक्टरांवर हल्ला करणे, तोडफोड करणे हे कधीच योग्य ठरत नाही.

८ अपाचे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात, सुरक्षा अधिक मजबूत

मसुद्यामध्ये डॉक्टरांवरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोपीने रुग्णालयातील जी तोडफोड केली आहे. त्याच्या बाजारमूल्याच्या दुप्पट रक्कम त्याला संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला द्यावी लागेल, अशीही तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.