पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हिंदी सिनेमा बघत नाही, पण दीपिकाचा बघावा लागेल...'

दीपिका पादुकोन

अभिनेत्री दीपिका पदुकोण दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी गेल्यानंतर ट्विटरवर #boycottchhapaak हॅशटॅग बुधवारी सकाळपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. दीपिकाची प्रमुख असलेला छपाक सिनेमा याच आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. कनिमोळी यांनी म्हटले आहे की मी सहसा हिंदी सिनेमा बघत नाही. पण यास्थितीत मी अपवाद म्हणून वेगळा निर्णय नक्की घेईन. कितीही लोकांनी त्या अभिनेत्रीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याविरोधात हॅशटॅग ट्रेंड केले तरी लोक तिचा सिनेमा बघण्यासाठी नक्की जातील. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

'काँग्रेस-NCPसोबत गेल्यामुळे हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेपासून दूर गेला'

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर रविवारी हल्ला झाल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळी अचानकपणे दीपिका पदुकोण आंदोलनस्थळी गेली होती. तिथे तिने कोणतेही वक्तव्य केले नाही. पण केवळ विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ती तिथे गेली होती. यामुळे आता तिच्या आगामी सिनेमावरून राजकारण तापले आहे.

रेल्वे प्रवास करायचाय? कोणती गाडी निवडणार...सरकारी की खासगी!

दीपिकाच्या या भेटीनंतर लगेचच दिल्लीतील भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी आपल्या समर्थकांना आपले ट्विट रिट्विट करण्यास सांगितले. या ट्विटमध्ये तिने दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. कनिमोळी यांनी जेएनयूतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.