पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताच्या अंतर्गत प्रकरणात दखल देऊ नका, तुर्कीला ठणकावले

तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रजब तय्यब एर्दोआन  आणि पंतप्रधान इमरान खान

पाकिस्तानच्या संसदेत काश्मीरवर भाष्य करणाऱ्या तु्र्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांना भारताने स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रजब तय्यब एर्दोआन यांच्या वक्तव्यावर टीका करत भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप न करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर भारताने तुर्कस्थानला पाकिस्तानच्या दहशतवादावर लक्ष देण्याचा सल्लाही दिला.

विवाहबाह्य संबंधांतून पाच मुलांच्या आईने केली नवऱ्याची हत्या

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीरवरुन तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांकडून देण्यात आलेले सर्व संदर्भ भारत फेटाळतो आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अभिन्न अंग आहे. जो कधीच वेगळा हो शकत नाही. एर्दोआन यांनी शुक्रवारी पाकिस्तानी संसदेत बोलताना म्हटले की, काश्मिरींच्या संघर्षाची तुलना पहिल्या महायुद्धादरम्यान विदेशी शासकांविरोधातील तुर्कस्थानच्या लढाईशी केली. 

देशात परतणाऱ्या चिनी नागरिकांसाठी कोरोनामुळे नवा नियम अन्यथा शिक्षा

जम्मू-काश्मीरवर एर्दोआन यांच्या वक्तव्यावर रवीश कुमार म्हणाले की, भारत जम्मू-काश्मीरसंबंधात देण्यात आलेले सर्व संदर्भ फेटाळतो. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. तो कधीच वेगळा होऊ शकत नाही. आम्ही तुर्कस्थानच्या नेतृत्वाला विनंती करतो की, त्यांनी भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये.

फेसबुकवर मी नंबर १ तर मोदी दुसऱ्या स्थानी, ट्रम्प यांचा दावा